जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून अशातच शिवसेना शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलीय. शिंदे गटाचे महानगर प्रमुख संतोष पाटील यांची उमेदवारी माघारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. महायुतीची जागा असल्याने पक्षाच्या आदेशानुसार माघार घेतल्याची संतोष पाटील यांची माहिती दिली.
जळगाव मनपाच्या प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. ही जागा महायुतीच्या भाजपमध्ये वाट्याला असल्याने पक्षाने माघार घेण्याचे निर्देश दिले असून, पक्षाचा आदेश मान्य करून आपण निवडणूक अर्ज मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज भरताना संतोष पाटील यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळू शकला नाही. त्यानंतर पक्षाकडून माघार घेण्यास सांगण्यात आल्याने आपण उमेदवारी मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संतोष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार किशोर पाटील उपस्थित होते. यामुळे काही जण नाराज झाल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतर्गत कुरघोडी असल्याचे मान्य केले.















Discussion about this post