Tuesday, June 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 26, 2025
in राष्ट्रीय
0
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देशातील वीस मुलांचा सन्मान; महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा समावेश
बातमी शेअर करा..!
नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित  करण्यात आले.  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी  छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला  गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 20 बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.
शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये मध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीचा गौरव
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट  योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लकवाग्रस्त  रुग्णांच्या हातांसाठी AI-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार  करणाऱ्या अर्णव महर्षी याने स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कृत बालक भारताच्या अमृत पिढीचे प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक  आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य  आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
या मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.
इतर पुरस्कार विजेत्यांची नावे
व्योमा प्रिया – शौर्य – तमिळनाडू  (मरणोत्तर)
कमलेश कुमार  – शौर्य – बिहार  (मरणोपरांत)
मोहम्मद सिडान पी – शौर्य – केरळ
अजय राज – शौर्य – उत्तर प्रदेश
एस्थर लालदुहोमि – कला संस्कृती – मिझोरम
सुमन सरकार – कला संस्कृती – पश्चिम बंगाल
पूजा – पर्यावरण – उत्तर प्रदेश
शवन सिंह – सामाजिक सेवा – पंजाब
वंश तायल – सामाजिक सेवा – चंदीगड
आइशी प्रिशा – विज्ञान तंत्रज्ञान – आसाम
अर्णव महर्षि – विज्ञान तंत्रज्ञान – महाराष्ट्र
शिवानी उपारा – क्रीडा – आंध्र प्रदेश
वैभव सूर्यवंशी – क्रीडा – बिहार
योगिता मंडावी – क्रीडा – छत्तीसगड
लक्ष्मी प्रगयिका – क्रीडा – गुजरात
ज्योति – क्रीडा – हरियाणा
अनुष्का कुमारी – क्रीडा – झारखंड
धिनिधि देसिंगु – क्रीडा – कर्नाटक
ज्योषणा सबर – क्रीडा – ओडिशा
विश्वनाथ कार्तिके – क्रीडा – तेलंगणा
बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! चौथीही मुलगी झाल्याच्या रागातून पित्याने केली नवजात बालिकेची हत्या

Next Post

अर्ज दाखल करण्यासाठी उरले काही तास; इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत मोठी गर्दी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अर्ज दाखल करण्यासाठी उरले काही तास; इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत मोठी गर्दी

अर्ज दाखल करण्यासाठी उरले काही तास; इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत मोठी गर्दी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! या आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषद उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

June 30, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भडगाव तालुक्यात भाविकांच्या ट्रॅक्टरला आयशरची जोरदार धडक, एक ठार, १५ जखमी

June 30, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

अखेर जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

June 30, 2026
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना

जळगाव हादरले! फत्तेपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ काढून केला व्हायरल; १४ जण अटकेत

June 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page