मुंबई । महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून याच दरम्यान राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. एकीकडे भाजपनं उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे दोन्ही राष्टवादी एकत्र आल्या आहेत. मात्र त्यावेळी काँग्रेसने महाआघाडीत बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय.
पक्षश्रेष्ठींनी त्याबाबत शहरातील कार्यकर्त्यांना सुचना केल्या आहेत. पुण्यात ठाकरे आणि इतर कोणी येत असेल तर त्यांच्याशी चर्चा करा मात्र अजित पवारांशी युती करू नका, असा स्पष्ट आदेश काँग्रेस पक्षाच्या हायकमांडनं दिलेत. या काँग्रेसच्या निर्णयानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवाडुच्या युतीचा मार्ग मोकळा झालाय.
पुण्यामध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे पुण्यातील अटीतटीचा लढती पहावायस मिळणार आहे. कारण आता महायुतीसह महाविकास आघाडीमधील पक्षही एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान पुण्यात काँग्रेस ठाकरे गटासोबत युती करेल असा अंदाज आहे.















Discussion about this post