जळगाव । शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका ठिबक निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली घडली. आगीत कारखान्यातील कोट्यवधी रूपयांचा ठिबक नळ्यांचा साठा जळून खाक झाला.
एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीची साई किसान नावाची ठिबक नळी तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये नियमित काम सुरू असताना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमधील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले, आग लागताच ती गोदामाच्या दिशेने पसरली व काही क्षणात बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचाही स्फोट झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिका अग्निशमन विभागाच्या चार बंबांसह भुसावळ, वरणगाव, नशिराबाद व जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे बंब दाखल झाले. याद्वारे आग विझविण्यान्यात आली. मात्र तोवर आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली. आग लागताच अन्य ठिकाणी काही दुर्घटना घडून नये म्हणून महावितरणच्यावतीने तात्काळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
रम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग लागण्याचे कारण तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.















Discussion about this post