बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने (भाजप + जेडीयू + इतर) 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहेत. दुसरीकडे, महागठबंधनला अवघ्या 48-50 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान बिहार निकालांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावलाय.
संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवले.” असं संजय राऊत म्हणाले
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत ठीक नसल्याचं समोर आलं होतं. बिहारच्या रिझल्टवर संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं राऊतांना सांगितलंय. तर काहींना हा हिंदू एकतेचा विजय असल्याचं म्हटलंय.















Discussion about this post