सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२५ आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
प्रोजेक्ट इंजिनियर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. जर इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही bel-india.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
काय आहे पात्रता?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३२ पेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई, बीटेक किंवा बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १०, १२वीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहेत. याचसोबत अर्ज सबमिट करण्यापूर्वी ४७२ रुपये शुल्क भरायचे आहे.
इतका मिळेल पगार?
बीईएलमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर पहिल्या वर्षी ४०,००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ४५००० रुपये पगार दिला जाणार आहे तर तिसऱ्या वर्षी ५०,००० रुपये पगार मिळणार आहे. पगारासोबत तुम्हाला इतर अनेक सुविधा मिळणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. तुम्हाला लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूमध्ये ३५ गुण मिळवणे आवश्यक आहे.















Discussion about this post