मुंबई । साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकणात अटकेत असलेल्या निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली सापडली, ज्यामध्ये तिच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. पीएसआय बदनेने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत 5 महिन्यांपासून छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पीएसआय गोपाळ बदनेला निलंबित करून अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करत पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.
गोपाळ बाळासाहेब बदने याने पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची वर्तणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय ठरेल असे वर्तन केले. म्हणून त्यास पोलिस खात्यात पदावर ठेवणे हे सार्वजनिक व लोकहितार्थ दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास शासकीय सेवेतून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून बडतर्फ केले आहे, असे प्रसिद्धी पत्रक पोलिस अधीक्षक सातारा यांनी काढले आहे.















Discussion about this post