उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील चुनार रेल्वे स्टेशनवर भयंकर रेल्वे अपघात झाला. रेल्वे रूळ ओलांडत असताना हावडा- कालक एक्स्प्रेसने काही भाविकांना चिरडलं. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले. मृतांची ओळख पटवणं देखील कठीण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या चुनार रेल्वे स्टेशनवर आज सकाळी ही घटना घडली. काही भाविक कार्तिक पौर्णिमानिमित्त गंगास्नान करण्यासाठी यात्रा करत होते. हे भाविक चुनार रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरून चुकीच्या दिशेने जात असल्यामुळे त्यांना ट्रेनने धडक दिली. भरधाव हावडा- कालका एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. अपघातामध्ये सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या रेल्वे अपघातानंतर चुनार रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. स्थानिक रेल्वे प्रशासनाने भाविकांना रेल्वे ट्रॅकवरून चालत जाऊ नका असे आवाहन केले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेदरम्यान ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post