भुसावळ : दिवाळीनंतर आणि छठ उत्सवाच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. ०१००५ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०१००६ ही गाडी नागपूर येथून २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी १८:१० वाजता सुटेल आणि पुढील दिवशी सकाळी ०८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.















Discussion about this post