बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती निघाली असून सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी अर्जाची प्रोसेस १० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा फायनान्समध्ये स्पेशलायझेशन केलेले असावे. किंवा CA/CMA/CS/CFA डिग्री प्राप्त केलेली असावी. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची ही संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदातील ही भरती कॉर्पोरेट अँड इन्स्टिट्यूशनल क्रेडिट विभागात रेग्युलर बेसवर होणार आहे. या पदांसाठी ५० जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ४२ वयोगटातील असावे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही आधी अधिसूचना वाचा.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४,८२० ते १,२०,९४० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे केली जाणार आहे. यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.















Discussion about this post