नवी दिल्ली । वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी नेते आणि सध्याचे भाजप प्रवक्ते प्रिंटु महादेव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना गोळ्या घालू असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर खळबळ उडाली असून याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली.
के.सी. वेणुगोपाल यांनी शहा यांना पत्र लिहून म्हटले आहे की, महादेव भाजपचे प्रवक्ते असून त्यांनी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. विचारपूर्वक लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.” जर या धमकीवर तात्काळ आणि निर्णायक कारवाई केली गेली नाही तर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याविरुद्ध झालेल्या हिंसाचारात ते सहभागी असल्याचे मानले जाईल. असं वेणुगोपालयांनी म्हटलं आहे
तसेच “सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने अशा विषारी शब्दांचा वापर केल्याने केवळ राहुल गांधी यांचे जीवन धोक्यात येत नाही तर संविधान, कायद्याचे राज्य आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत सुरक्षा हमींनाही धक्का बसतो – विरोधी पक्षनेते तर सोडाच.” राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) त्यांच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांबाबत अनेक पत्रे लिहिली आहेत, असे वेणुगोपाल म्हणाले.
ते म्हणाले, “आश्चर्यकारकपणे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना उद्देशून लिहिलेले असेच एक पत्र गूढ परिस्थितीत माध्यमांना लीक झाले, ज्यामुळे त्यामागील हेतूबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.”















Discussion about this post