सोलापूर : अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंडखोरी केली. यानंतर पक्षात दोन गट पडले आहे. एकीकडे शरद पवार नव्याने पक्षबांधणी करत असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोलापूरमधील शरद पवार यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. जितेंद्र साठे हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.
मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या मध्यस्थीने त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांच्या पुत्रानेच अजित पवारांच्या गटात प्रवेश केल्याने सोलापुरात शरद पवार यांच्या गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.