धुळे : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून जवळपास १०७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्सचा साठा धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
ड्रग्स तसेच अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करण्यास बंदी असतानाही छुप्या पद्धतीने ड्रग्सची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. धुळ्यात करण्यात आलेल्या कारवाईने पुन्हा एकदा एमडी ड्रग्स विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाया झाल्यानंतर याचे मुंबई कनेक्शन समोर येत असून कारवाईनंतर पुन्हा ड्रग्स तस्करी सुरु होते.
दरम्यान धुळे पोलिसांना गुप्त माहिती दाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरात एमडी ड्रग्सचा साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता या सापळा दरम्यान एका वाहनामध्ये दोन संशयित ईसम पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हे वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली.
सदरच्या वाहनामध्ये १०७ ग्रॅम इतका एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेत तपास सुरु आहे. तर यापूर्वी देखील धुळ्यात अशाच प्रकारे एमडी ड्रग्सचा साठा पुरविण्यात आला आहे का आणि तो कोणाच्या सांगण्यावरती आणि कुणासाठी हा एमडी ड्रग्सचा साठा धुळ्यात आला होता; याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह धुळे पोलीस करीत आहेत.















Discussion about this post