जळगाव | राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा, ज्वारी आदी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा उद्देश आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी गटांना महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा २ सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीक प्रात्याक्षिकासाठी नोंदणी करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पूर्वी नोदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था या अर्ज करु शकतात प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्याक्षिके, पलेक्शी घटक, औषधे आणि खते यासाठीही शेतकरी गटाना अर्ज करावे लागणार आहे. मात्र, प्रत्येक गटातील सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
फक्त निर्धारित मुदतीत अर्ज करणाऱ्या शेतकरी गटांनाच या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होता येईल. शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.















Discussion about this post