Sunday, July 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनैतिक संबंधांच्या वादातून मित्राचाच खून; रावेरातील गुन्ह्याचा २४ तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 12, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

रावेर | रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात मजूर तरुणाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. अनैतिक संबंधांमधून निर्माण झालेला वाद आणि जुन्या मारहाणीचा सूड या दुहेरी कारणातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (वय २७, रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश संजय घोरपडे (वय २७, रा. भोर, ता. रावेर) आणि मेघराज वसंत सांगळे (वय २९, रा. भोर, ता. रावेर) यांचा समावेश आहे.

अनैतिक संबंधातून निर्माण झाला वाद

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश घोरपडे याचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना नागरिकांनी रंगेहात पकडल्यानंतर गणेशला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा राग त्याच्या मनात कायम होता. त्यानंतर त्याने मयताला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

दारू पाजून निर्जन शेतात नेले

९ जुलैच्या रात्री आरोपींनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारातील निर्जन भागात नेले. तेथे दोघांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतात टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

११ जुलै रोजी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. रावेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पीएसआय मनोज महाजन यांनी तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मेघराज सांगळे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले.

मध्य प्रदेशातून मुख्य आरोपीला अटक

मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा गुन्ह्यानंतर मध्य प्रदेशात पळून गेला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला.पीएसआय संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी आणि सचिन घुगे यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील सागवानी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा हा खुनाचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रावेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

Next Post

अमित शाहांनी बोलावलं, पण ..; भाजप घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, पहा काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमित शाहांनी बोलावलं, पण ..; भाजप घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, पहा काय म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडचा वापर; जळगाव जिल्ह्यातील शिंदें सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

July 12, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमित शाहांनी बोलावलं, पण ..; भाजप घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष्टच बोलले, पहा काय म्हणाले..

July 12, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

अनैतिक संबंधांच्या वादातून मित्राचाच खून; रावेरातील गुन्ह्याचा २४ तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

July 12, 2026
धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

July 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page