भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. टेक्निकल ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.
या नोकरीसाठी तुम्हाला www.ecil.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा ३० निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना सुरुवातीला २५००० रुपये पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी २८००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर कामाचा अनुभव आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई किंवा बीटेक केलेले असावी. याचसोबत ECE/ETC/E&I/इलेक्ट्रॉनिक्स/EEE/इलेक्ट्रिक/सीएई/आईटी/मैकेनिकलमध्ये डिग्री पाप्त केलेली असावी. याचसोबत त्यांनी एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप केलेली असावी.
अर्ज कसा करावा?
तुम्ही सर्वात आधी www.ecil.co.in या वेबसाइटवर जावे.
यानंतर जॉब ओपनिंग या सेक्शनवर जावे.
यानंतर तुम्हाला आपली माहिती भरायची आहे. यानंतर सही आणि फोटो अपलोड करायचा आहे.
रजिस्ट्रेशन शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. यानंतर प्रिंट आउट काढून घ्या.















Discussion about this post