जळगाव । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.
तालुक्यातील वरखेडीमध्ये प्रवास करीत असतांना आदिवासी कुटुंब एका शेतात मुक्कामाला थांबले होते. याच दरम्यान, त्यांना विजेचा शॉक लागून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. हे कुटुंब कुठले आहे याची ओळख पटविली जात आहे. आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखले झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे. एक वर्ष वय असलेली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार अमोल चिमणराव पाटील तसेच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.















Discussion about this post