जळगाव । भल्या पहाटेआज जळगाव शहरानजीक निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय जवळ झाला अपघात ! ज्यात भरधाव अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटनाघडली
ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी मयत बांधवांची नावे आहेत.मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात दोघं सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Discussion about this post