धुळे । सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशातच दोंडाईचा येथील गुलमोर कॉलनीमधील भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठे नुकसान झाले. रहिवासी वस्तीमध्ये गोडाऊन असल्याने परिसरातील नागरिकांची नाराजी बघायला मिळत होती.
येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गोडाऊनमध्ये प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीच्या ज्वाळा व धूर वाढल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती येथील ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या ८ बंबाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत भंगार गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले.
या आगीचे कारण समोर आलेले नाही. दोंडाईचा शहरातील मोहम्मदिया नगरच्या रस्त्याकडे जाणारे गुलमोहर कॉलनीत भंगार गोडाऊन मध्यरात्रीच्या अडिच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. नागरिकांना या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. दोंडाईचा, शिरपूर, धुळे, साक्री, नंदुरबार मिळून अशा एकूण आठ अग्निशमन बंबांनी आग विझविण्याचे काम सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू होते. फारूख पिंजारी यांच्या मालकीचे हे गोडाऊन होते.
दरम्यान या गोडाऊनला लागूनच वसीम मजिद पिंजारी यांचे घर होते. त्यांच्या घराच्या बेडरुमचा दरवाजा व कुलर खिडक्या जळून खाक झाले आहे. सदरची घटना वेळीच लक्षात आल्याचे मोठी हानी टळली. दरम्यान रहिवासी वस्तीमध्ये या गोडाऊनला परवानगी दिली कोणी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. इतर गोडाऊनच्या देखील परवानगीचे तपासणी नगर परिषदेने करून घ्यावी. जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येऊ शकतील.















Discussion about this post