मुंबई । एकीकडे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून कंबर कसली असून मात्र यातच राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश घेत आहे. अशातच आता सांगलीत काकाच्या पक्षाला पुतण्याने मोठं खिंडार पाडलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. कारण माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
मुंबईत महाराष्ट् क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी 4 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे. सांगली जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश पार पडेल. हे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांच्या पक्षप्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.















Discussion about this post