मुंबई । गेल्या आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात सोने दरात घसरण झाली होती. उच्चांकीपासून सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला असून सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे.
देशांतर्गत वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याच्या किमतींनी विक्रम मोडला आहे. सोन्याचा भाव गगनाला भिडतोय. एमसीएक्सवरील सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ११ एप्रिल रोजी सोन्याने प्रति १० ग्रॅम ९३२०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली.
ही आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या सत्राच्या तुलनेत सोन्यात २% पेक्षा जास्त वाढ दिसून येते. कारण काल संध्याकाळी ५ वाजता सराफा बाजार उघडला आणि त्यात सतत वाढ नोंदवली गेली. यामध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ११४३ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.















Discussion about this post