Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले
बातमी शेअर करा..!

जळगाव । चांगदेव महाराज तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि. 21 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी SDRF व आपदा मित्र यांच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व सरपंच चांगदेव आदी उपस्थित होते.

दुपारी 3.25 वाजता तापी-पूर्णा संगमावर प्रवासी बोटीतून संगमदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात पडण्याचा प्रकार घडला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तैनात असलेल्या बोटीने तातडीने बचाव कार्य करत दुपारी 3.30 वाजता संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार दिले.

दुपारी 3.45 वाजता पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व गर्दी नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमच्या बचाव कार्याचा आढावा घेत रंगीत तालीम राबवण्यात आली. दरम्यान, श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर (मेहुण) परिसरात दुपारी 3.52 वाजता गवताला आग लागल्याची दुसरी घटना घडली. तहसीलदार मुक्ताईनगर यांनी तातडीने बोदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचित केले. दुपारी 4.05 वाजता अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम उपक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील,तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमचे 3 अधिकारी व 24 जवान तसेच 20 आपदा मित्र उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार यावर्षी सदर यात्रेचे पूर्वनियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तहसील कार्यालयात जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर चोरीला

Next Post

विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोबत राहू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोबत राहू

विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोबत राहू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page