नवी दिल्ली । राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे.दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत आज सोमवारी पहाटे ५.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही रिश्टर स्केलवर 4.0 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ पृथ्वीपासून 5 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूर, मुरादाबाद, आग्रा, पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा आणि राजस्थानमधील अलवर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय हरियाणातील हिसार, कुरुक्षेत्र, कैथल येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्ली पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे
दिल्ली-एनसीआरमधील भूकंपानंतर दिल्ली पोलिसांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आणि म्हटले, “आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी, 112 डायल करून आमच्याशी संपर्क साधा.”















Discussion about this post