जळगाव । तुमच्यासोबत व्यापार करायचा आहे सांगून कर्नाटकातील व्यापाऱ्याने पोलन पेठेतील हार्डवेअर व्यावसायिकाला ५ लाख ५६ हजार रूपयांचा चुना लावला. व्यावसायिकाकडून ६ लाख ९५ हजार रूपयांचा माल खरेदी केल्यानंतर केवळ १ लाख ३८ हजार रूपयेच अदा केले. उर्वरित पैसे न देता फोन बंद करून कर्नाटकातील व्यापारी पसार झाला. याकरणी व्यापाऱ्याविरूज्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज विष्णू रडे यांचा पोलन पेठेत प्रभात हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रिकल जनरल प्रा.लि. नावाचे दुकान आहे. जानेवारी २०२३ मध्ये लक्ष्मण शिवाप्पा असंगी नामक व्यक्ती त्यांच्या दुकानावर आला. ६ लाख ९५ हजार २५१ रूपयांच्या मालाची ऑर्डर दिली. त्यापोटी त्याने ४९ हजार ५०० रूपये रडे यांच्या खात्यावर पाठवले. नंतर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी ५० हजार रूपये आणखी पाठवून रडे यांचा विश्वास संपादन केला.
नंतर उर्वरित रक्कम ही पंधरा दिवसात पाठवेल असे सांगितले. रडे यांनी संपूर्ण माल हा कर्नाटकात पाठवला. असंगीकडे वारंवार पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने केवळ ३९ हजार रूपये पाठवले. नंतर पैसे देग्यास टाळाटाळ केली. अखेर ५ लाख ५६ हजार रूपयांचा धनादेश पाठवला. पण, तोही एररमुळे वटला नाही















Discussion about this post