नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ऑटो उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मारुती सुझुकीने कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १ फेब्रुवारी २०२५ लागू होणार असून मारुती गाड्या ३२,५०० रुपयांनी महागणार आहेत.
एक्सचेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे, कंपनी १ फेब्रुवारी २०२५ पासून कारच्या किमती वाढवण्याची योजना आखत आहे. इनपुट खर्चात झालेली ही वाढ, जसे की साहित्याच्या किमतीत वाढ, ईंधन दरातील बदल, आणि इतर उत्पादन संबंधित खर्च, यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
कोणत्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ?
ऑल्टो K10: १९,५०० रुपयांनी महागणार
एस-प्रेसो: ५,००० रुपयांनी महागणार
सेलेरिया: ३२,५०० रुपयांनी महागणार
वॅगन आर: १५,००० रुपयांनी महागणार
स्विफ्ट: ५,००० रुपयांनी महागणार
डिझायर: १०,५०० रुपयांनी महागणार
ब्रेझा: २०,००० रुपयांनी महागणार
अर्टिगा: १५,००० रुपयांनी महागणार
ईको: १२,००० रुपयांनी महागणार
सुपर कॅरी: १०,००० रुपयांनी महागणार
इग्निस: ६,००० रुपयांनी महागणार
बलेनो: ९,००० रुपयांनी महागणार
सियाझ: १,५०० रुपयांनी महागणार
XL6: १०,००० रुपयांनी महागणार
फ्रॉन्क्स: ५,५०० रुपयांनी महागणार
इन्व्हिक्टो: ३०,००० रुपयांनी महागणार
जिम्नी: १,५०० रुपयांनी महागणार
ग्रँड विटारा: २५,००० रुपयांनी महागणार















Discussion about this post