मुंबई । राज्यात महायुती सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा 1500 रुपये देण्यात येत असून जुलै २०२५ ते डिसेंबर २०२४ असे सहा महिन्याचे ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. यातच आता लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. अशातच योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
जानेवारी 2025 महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे.
त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधि जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं. उद्यापर्यंत (26 जानेवारी) सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केलं















Discussion about this post