महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला १५०० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात पाठविले जात आहे. या योजनेचे आतापर्यंत सहा महिन्याचे ९००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आणि आता लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधीच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे मोठं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अपात्र लाडक्या बहिणींना स्वतः हून नावे काढायला सांगितले होते. जर त्यांनी स्वतः हून या योजनेतून नावे काढली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान या चर्चा सुरु असतानाच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहे. ६० लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात ६० लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहे. त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, असं विनायक राऊत यांनी सांगितले आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत महिला पात्र नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र नाहीत तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना आमचं सरकार सुरु ठेवणार आहे. या योजनेत जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन पैसे घेतले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात.
यानंतर आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत काम करत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे निकषांबाहेर जाऊन जर तुम्ही योजनेाचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.















Discussion about this post