दहावी आणि आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना राज्याच्या वीज कंपनीत काम करण्याची संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड जळगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्जमागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा .महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
पदांची संख्या-१४०
(इलेक्टीशियन-८८, वायरमन ३५ व संगणक चालक-१७)
शैक्षणिक पात्रता : १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक.
नोकरीचे ठिकाण: जळगांव जिल्ह्यात कोठेही
वेतनश्रेणी : कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
वयाची श्रेणी : १८ ते ३० वर्षे (अनु. जाती व अनु. जमाती यांच्यासाठी ५ वर्ष शिथील)
फक्त जळगाव जिल्हातील राहिवाशी उमदेवारांना अर्ज करता येईल.
खालील दर्शविलेल्या कालावधीत आपले शैक्षणीक कागदपत्रे BTRI च्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी (ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज प्रोफाईल परिपुर्ण (१००%) करणे आवश्यक आहे. एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस. सी. बोर्ड प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रक, आयटीआय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अदयावत आधारकार्ड) एक छायांकीत स्वयंम स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी.जळगांव ४२५००३ येथे खाली दिलेल्या वेळापत्रक नुसार जमा करावे.















Discussion about this post