भुसावळ । भुसावळ शहरात हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय.. ज्यात खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात 27 वर्षीय तेहरीन नासीर शेख याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. तेहरीन मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ येथील राहणारा होता.
तेहरीन चहा पिण्यासाठी दुकानात आल्यानंतर, तोंडाला रूमाल बांधून दोन दुचाकीवर आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी गावठी पिस्टलातून पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली आणि संशयीत दुचाकीवरून लगेच पसार झाले. तेहरीनच्या शरीरात विविध भागात गोळ्या लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चार संशयीतांचा कसून शोध सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचे सांगितले जाते.















Discussion about this post