जळगाव । एकीकडे देशभरात लग्नसराई सुरु असून यादरम्यान ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं समोर आलंय. आज गुरुवारी 9 जानेवारी 2025 ला सोन्याच्या भावात 100 रुपयांची वाढ झाली आहे.
गुरुवारी 9 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपये आणि 22 कॅरेट गोल्डमध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता भारतात 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 78000 रुपये आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 72 हजारांच्या पुढे आहेत. आज 9 जानेवारीला चांदीच्या भावात वाढ झाली आहे. तसेच आज एक किलोग्रॅम चांदीचे भाव 92500 रुपये आहेत.
तुमच्या शहरातील आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
जळगाव – ७७,९३० रुपये
मुंबई – ७७,९३० रुपये
पुणे – ७७,९३० रुपये
नागपूर – ७७,९३० रुपये
कोल्हापूर- ७७,९३० रुपये















Discussion about this post