नवी दिल्ली । कोरोनानंतर आता चीनमध्ये HMPV हाहाकार माजवित आहे. चीनमध्ये सापडललेया HMPV व्हायरस आता भारतातही पसरू लागला आहे. भारतातही या व्हायरसचे ८ ते १० रुग्ण आढळून आल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत.
HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आरोग्य सचिव, अधिकारी आणि युनिट्सची महत्त्वाची बैठक घेतली. ही बैठक आज (दि.७) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. दरम्यान, केंद्रीय सचिवांनी राज्यांनी श्वसनाच्या आजारावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिली आहेत.
केंद्र सरकारने राज्यांना ILI (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि SARI सह (तीव्र श्वसन संसर्ग) श्वसन आजारांवर देखरेख वाढवण्याचा आणि मानवी मेटाप्न्यूमोव्हायरसच्या (HMPV) प्रसाराला प्रतिबंध करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे.
मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा अनेक श्वसन विषाणूंपैकी एक आहे. ज्याचा सर्व वयोगटातील लोकांना विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यांत संसर्ग होऊ शकतो. विषाणूचा संसर्ग सामान्यतः सौम्य आणि स्वयं-मर्यादित स्थितीत असतो. त्यामुळे बहुतेक रुग्ण स्वतःहून बरे हाेत आहेत. आयसीएमआर-व्हीआरडीएल प्रयोगशाळांमध्ये पुरेशा निदान सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. हिवाळ्याच्या महिन्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ दिसून येते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संभाव्य वाढीसाठी देश सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिबंधासाठी राज्यांनी ‘हे’ उपाय करावेत
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीदरम्यान राज्यांना साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे; डोळे, नाक किंवा तोंडाला न धुता स्पर्श करणे टाळणे; रोगाची लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे; खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे इत्यादी सोप्या उपायांसह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये आयईसी आणि जागरूकता वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.















Discussion about this post