यूको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत काही पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी भरतीप्रक्रिया २७ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ()
युको बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही ucobank.com वर जाऊन डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन अर्ज भरा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ आहे.
युको बँकेतील या नोकरीसाठी६८ जागा रिक्त आहेत. त्यात इकोनॉमिस्ट, अग्नि सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, रिस्क ऑफिसर, आयटी ऑफिसर, चार्टड अकाउंटंट अशा विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. (UCO Bank Job)
अर्ज कसा करावा? (How To Apply)
या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम युको बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीवर क्लिक करायचे.
यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करुन तुमची सर्व माहिती भरा.
रजिस्ट्रेशन झाल्यावर इतर माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.
यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
२१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी/बीई/बीटेक/ सीए पदवी मिळवलेली असावी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये अर्जशुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे.















Discussion about this post