बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी भरती होणार आहे. तब्बल 1276 पदांवर ही भरती होणार आहे, जर तुम्हालाही बँकेत काम करायचे असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे .
इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. Bankofbaroda.in या वेबसाइटवर या नोकरीची सर्व माहिती दिली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला IBPS वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
मार्केटिंग ऑफिसर, सेल्स मॅनेजर, सिनियर मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट मॅनेजर,सिक्युरिटी अॅनालिस्ट ऑफिसर, सिक्युरिटी अॅनालिस्ट मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यासाठी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा.
यानंतर Current Openings टॅबवर क्लिक करा.
यानंतर Recruitment of professionals on a regular basis on various departments वर क्लिक करा.
त्यानंतर रजिस्टर करा आणि अर्ज भरा.
यानंतर अर्ज शुल्क भरुन तुम्ही फॉर्म सबमिट करा.















Discussion about this post