जळगाव । हवामान विभागाकडून दिलेल्या ईशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यात येत्या दोन दिवसात आज व उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या नुसार आज जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी
अचानक जोरदार पाऊसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कतेचा सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला दि २७ व २८ डिसेंबर रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात आज २७ डिसेंबर रोजी मध्यम पाऊस झाला. दरम्यान, उद्या २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवारा आणि गारपीटीसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post