मुंबई । मुंबईतील समुद्रात बोटीचा भीषण अपघात झाला असून यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या तिघांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
‘नीलकमल नावाच्या फेरीबोटीला नौदलाची स्पीड बोट धडकल्याने भीषण अपघात झाला. ही बोट एलिफंटाला जात होती या दुर्घटनेतून १०१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतची ही माहिती आहे. यात १० नागरिक आहेत. तर ३ नेव्हीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नेव्हीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत आणखी काही जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘पोलिसांपासून कोस्टगार्ड प्रवाशांच्या मदतीला धावले. या बचावकार्यात नौदलाच्या ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. या घटनेची अंतिम माहिती उद्यापर्यंत देण्यात येईल. सर्व शासनाच्या यंत्रणा घटनेनंतर कामाला लागल्या आहेत. या घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करण्यायत आली आहे. या घटनेची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाणार आहे’.















Discussion about this post