नागपूर । महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट दालनात जाऊन भेट घेतली.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे थेट नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले. या भेटीदरम्यान, ७ मिनीटात काय चर्चा रंगल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.
दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.















Discussion about this post