जळगाव | आंघोळ करत असताना नकळत २२ वर्षीय तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अयोध्या नगर परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबासह राहत आहे. दरम्यान १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित आरोपी राहुल पाटील याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान, हा अत्याचार असहय झाल्याने तिने अखेर एमआयडीसी पोलिसातून तक्रार दिली.
त्यानुसार संशयित आरोपी राहुल योगराज पाटील वय-२६, रा. आयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.















Discussion about this post