मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. सध्या लग्नाचा सिझन सुरु असून सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येतेय. यातच आज मंगळवारी सोन्याच्या दर काहीसे वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या खिशाला चाप बसणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १७ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत 78,150 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,165 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,320 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,650 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,150 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,520 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,815 रुपयांनी विकलं जात आहे.















Discussion about this post