मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाला आहे यामुळे नव्या सरकारचा विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. यातच सत्तास्थापनेपूर्वी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला बळकट करण्यासाठी वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार झाल्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. याबाबतचा एक शासन निर्णय जारी करण्यात आला. मात्र 24 तासात हा निर्णय मागे घेतला आहे.
वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक होती, अशी माहिती मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी दिली. त्यामुळे वक्फ संदर्भातील जीआर मागे घेतल्याचे मुख्य सचिव यांनी सांगितले.
राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नाही. कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. मग असे असतानाही हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.















Discussion about this post