धुळे : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत कापूस काढून त्या ठिकाणी दुसऱ्या पिकाची तयारी शेतकरी करत असतात. परंतु सर्वच ठिकाणी कापूस काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू झाली असल्यामुळे मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना भासू लागला आहे.
वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती सर्वदूर सारखीच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. धुळे जिल्ह्यात देखील हे चित्र असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याने कापूस काढणी विना तसाच राहिला आहे. कापूस काढणी होत नसल्याने उन्हामुळे कापसाचे वजन देखील कमी होण्याची भीती असते. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे.
धुळे जिल्हाभरात निम्म्याहून अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला कापूस काढून त्या ठिकाणी दुसरे पिक घेण्यासाठी शेतीची मशागत देखील सुरू केली आहे. परंतु वाढीव दर देऊन देखील मजूर मिळत नसल्यामुळे काढणीला आलेला कापूस काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. तर मजूर नसल्याने काही शेतकरी स्वतः घरच्या घरी कापूस वेचणी करत आहे.















Discussion about this post