जळगाव । प्रहसनाव्दारे भोंदुगिरीपासून स्त्री भृण हत्येसारख्या विषयांवर केलेले जळजळीत भाष्य, नवीन शैक्षणिक धोरणाचे आपल्यापरीने झालेले आकलन करीत घातलेला वाद-विवाद, हुकमतीने गायलेले पाश्च्मिात्य समुह व एकल गायन आणि क्ले मॉडेलिंगव्दारे साकारलेली छोटया मुलांची सुबक खेळणी या वैशिष्ट्यांसह युवारंग युवक महोत्सवाचा तिसरा दिवस अनुभवायला मिळाला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व्दारा आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाला २४ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. शनिवारची सकाळ रंगमंच क्र.५ वरील राणी दुर्गावती सभागृहात मातीकला या कला प्रकाराने सुरु झाली. या स्पर्धेत ३९ स्पर्धकांनी भाग घेतला. युवारंग, लहान मुलांची खेळणी असा विषय परीक्षकांनी दिला होता. अडीच तासाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मातीकलेव्दारे स्पर्धकांनी हुबेहुब लहान मुलांच्या खेळण्यांचे दर्शन घडविले तसेच युवारंग आपल्या कलेतून सादर करण्याचा प्रयत्न केला.

याच सभागृहात दुपारी पोस्टर मेंकींग स्पर्धा झाली. या स्पर्धेकरीता तुमच्या स्वप्नातील भारत आणि कोविड १९ मधील समाज जीवन हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेत ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याच सभागृहात छायाचित्रण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात त्यांनी त्यांच्या कल्पकतेला वाव देत सुंदर, अप्रतिम असे स्थळ छायाचित्रण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

रंगमंच क्र.४ राणी लक्ष्मीबाई सभागृहात पाश्चिमात्य एकल गीत गायन स्पर्धा झाली. या स्पर्धेत १६ कलावंतांनी भाग घेतला. लोकप्रिय असलेली मी अॅण्ड यू, यू आर ब्युटीफुल, बेबी बेबी, व्टीस्ट द डान्स आदी श्रवणीय समुहगीत सादर करतांना या गीतांवर प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. पाश्चात्य वेशभूषा, केशभूषा, देहबोली हे सर्व काही भारावून टाकणारे होते. दुपारसत्रात या रंगमंचावर पाश्चिमात्य वाद्यसंगीत एकल या स्पर्धेने रंगत आणली. या स्पर्धेत कलावंतांनी गिटार, ड्रमसेट, कीबोर्ड, व्हायोलिन आदी वाद्य तन्मयतेने वाजवून या वाद्यांवर आपले प्रभूत्व दाखविले. दुपारी ४ वाजता या सभागृहात भारतीय नाटयसंगीत एकल गायन ही स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी ११ कलावंतांनी नोंद केली होती.

रंगमंच क्र.१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात प्रहसन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत २२ संघांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर भोंदुगिरीपासून स्त्री भृण हत्येसारख्या विषयांवर जळजळीत प्रकाश टाकला. तसेच सोशल मिडीयाचा व मोबाईलचा गैरवापर, भरकटलेली तरुणाई, भ्रष्टाचार, कॉपी मुक्त अभियान, बदलती राज्यस्तरीय व्यवस्था, कॉमन मॅनच्या अडचणी अशा अनेक विषयांवर कलावंतांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे सादरीकरण केले.

रंगमंच क्र. ३ ताराराणी सभागृह या रंगमंचावर पाश्चिमात्य समुहगायन स्पर्धेत सहा संघांनी गायन केले. या संघांनी विविध पाश्चिमात्य गाणी सादर केली. प्रत्येक सादरीकरण एकमेकाच्या तोडीस तोड असल्याचे विद्यार्थी त्यांच्या कलेतून दाखविण्याचा प्रयत्न करीत होते.
रंगमंच क्र.२ राजमाता जिजाऊ सभागृहात वादविवाद स्पर्धा रंगली. नवीन शैक्षणिक धोरण हा विषय स्पर्धेसाठी होता. हा विषय विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वत: केलेल्या आकलनावरुन अनुकुल बाजू मांडतांना भारत भविष्यात महासत्ता होईल तर प्रतिकुल बाजू मांडतांना भारतात मजूर निर्माण होण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मतानुसार मांडले. विद्यार्थ्यांनी अनेक बाबींवर अनुकल व प्रतिकुल बाजू मांडली. या स्पर्धेत ६१ महाविद्यालयांच्या संघांनी भाग घेतला.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उन्हाचा तडाखा बसत असतांनाही स्पर्धकांमध्ये चैतन्यदायी उत्साह होता. भोजन व निवास व्यवस्था उत्तम असल्यामुळे स्पर्धक संयोजनावर समाधानी होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, युवारंगाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परीषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विद्यार्थी विकास समिती अध्यक्ष व व्य.प.सदस्य श्री.नितीन झाल्टे, व्यवस्थापन परीषद सदस्य प्रा. शिवाजी पाटील, डॉ. पवित्रा पाटील, अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, अधिसभा व विद्या परिषदस सदस्य, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकूरवाळे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

महोत्सवातील उद्याचे कार्यक्रम-
उद्या रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी रंगमंच क्रमांक १ (पदवीप्रदान सभागृह -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता भारतीय लोक समुहनृत्य,
रंगमंच क्रमांक २ (सिनेट सभागृह -राजमाता जिजाऊ सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता भारतीय सुगम संगीत एकल
रंगमंच क्रमांक ३ (सामाजिक शास्त्रे प्रशाळा – ताराराणी सभागृह) सकाळी ८.३० वाजता भारतीय शास्त्रीय नृत्य
रंगमंच क्रमांक ५ (जैवशास्त्र प्रशाळा – राणी दुर्गावती सभागृह) सकाळी ८.३० वाजता इन्स्टॉलेशन, स्थळचित्रण अंतिम फेरी, दुपारसत्रात रांगोळी व मेहंदी स्पर्धा.















Discussion about this post