असे म्हणतात की मानवी जीवन आणि मृत्यूला मर्यादा नाही, मृत्यू कधी, कोणत्या स्वरूपात आणि कोठून येईल याची शाश्वती नाही. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील रीवा येथून समोर आला आहे. तरुण एका दुकानात आपल्या मित्रांसोबत हसत-मस्करी करत होते. त्यानंतर अचानक तो खुर्चीवरून खाली जमिनीवर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्याची धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, तरुणाच्या मृत्यूचा हा धक्कादायक व्हिडिओ रीवा शहरातील सिरमौर चौकातील आहे. जिथे बजरंग नगर येथील रहिवासी प्रकाशसिंग बघेल हे चौकात असलेल्या एका दुकानात आपल्या मित्रांसोबत हसत-मस्करी करत होते. त्यानंतर अचानक तो खुर्चीवरून खाली जमिनीवर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
एक और लाइव मौत;
मध्य प्रदेश के रीवा में दोस्तों के साथ हंसते-बोलते हुए एक युवक अचानक नीचे गिरा और उसकी मौके पर ही मौत हो गई।
डॉक्टर ने मौत का कारण हार्ट अटैक बताया है। देखिए वीडियो ..#Livedeath #MPNews pic.twitter.com/r8WAokupAx
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) October 24, 2024
हा सर्व प्रसंग दुकानातील सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे. दुकानातील सिसिटीव्ह व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एका दुकानात पाच व्यक्ती बसलेले दिसत आहे. मात्र सर्व व्हिडिओत दिसणारे व्यक्ती मित्र आहेत. जे दुकानात निवांत गप्पा मारत बसलेले आहेत. सर्वांच्या गप्पा सुरु असताच तो पर्यंत त्यांच्यामधील एक तरुण जोरात जमिनीवर कोसळतो. त्यानंतर त्याचे मित्र घाबरुन त्याला उचलतात आणि मग त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रसंग दुकानातील सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.
मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ एक्सवरील ”@vinaysaxenaj” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ”मध्य प्रदेशातील रेवा येथे मित्रांसोबत हसत-खेळत बोलत असताना अचानक एक तरुण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला” असे कॅप्शन देण्यात दिलेले आहे.















Discussion about this post