हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून एचएएलमध्ये डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, फायनान्स ऑफिसर अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी ४४ रिक्त जागा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ()
हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ३० ते ४७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ४०,००० ते २,४०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करावे लागतील.















Discussion about this post