मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं आज वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे. रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजित क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखीस जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं आदराने नाव घेतलं जातं.
अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
“भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे”, असं देखील मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.















Discussion about this post