ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे दर पुन्हा गगनाला भिडले असून यामुळे सर्वसामान्य माणसाचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी नगर वैजापूर मार्गावर खाद्यतेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला आहे.पलटी झालेल्या टँकरमधून खाद्यतेल पळविण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या नागरिकांच्या गर्दीत तुम्ही पाहिले तर एक मोठा टँकर रस्त्यावर पलटी झालेला आहे. मात्र या टँकरमधून मोठ्या प्रमाणात खाद्य तेल पसरले आहे. हे खाद्य तेल (oil) घरी नेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अनेक भाड्यांतून ते नेत आहे. एकीकडे राज्यात खाद्य तेलाच्या किंमती वाढलेल्या आहेत त्यात या नागरिकांना असे फुकट मिळाल्याने ते घरी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे. सर्व प्रकार व्हिडिओमध्ये(Video_ एका व्यक्तीने कैद केलेला आहे.
https://twitter.com/TanviPol116027/status/1837713820149522941
सर्व व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@TanviPol116027” शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,”खाद्यतेलाचा टँकर उलटला; तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड” असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,” काय हे नागरिक” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,” कमाल आहेत लोकं” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.















Discussion about this post