मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अजित पवार गटाची उमेदवारांच्या नावाची यादी फायनल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता शिंदे गटाबद्दलही मोठी अपडेट समोर आली आहे.
‘आमच्या देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल होण्यामध्ये आलेली असल्याची माहिती शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ती यादी सुद्धा आमचे नेते एकनाथ शिंदे लवकरच जाहीर करतील.”असं ते म्हणाले
ते म्हणाले, ”एक-दोन दिवसांमध्ये आमची सुद्धा यादी जाहीर होईल, असा अंदाज आहे. लोकसभेच्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीत राहिला, तसा विधानसभेत होणार नाही. ती काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेत आहेत. यात वाद होऊ नये आणि जो विलंब लागतो, तसं होऊ नये. ज्या जो उमेदवार निवडून, त्यालाच उमेदवारी देण्यात येईल, असे निश्चित असेल. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची शक्ती आहे, त्या जागा लवकर जाहीर करून, कामाला लावावं.”
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, ”चौकटीत राहून उमेदवार पुढचा कामे करत असतो.” अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ”बारामती हा अजित पवार यांचे होम ग्राउंड आहे. गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य आहे. जवळपास सव्वा लाख मतांचा होतं. लोकसभेत वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. पण लोकसभा आणि इतर विधानसभा नगरपालिका या निवडणुका या वेगवेगळ्या असतात.”















Discussion about this post