नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलीय स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्येस अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. ३०० पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची सुरुवात १८ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. याबाबत सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांना कामाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. तुम्ही sailcareers.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ट्रेड, टेक्निशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. ३५६ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १६५ पदे रिक्त आहेत. टेक्निशियन पदासाठी १३५ जागा रिक्त आहेत तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ५३ जागा रिक्त आहेत. एकूण ३५६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयटीआय परीक्षा पास केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी बीई/बीटेक ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात.















Discussion about this post