सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष दहावी पास असलेल्या उमेदवारांना इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. भारतीय आयकर विभागात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.
या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.मुख्य आयकर आयुक्त (सीसीए) आणि आयकर विभागाद्वारे ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.१० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
इन्कम टॅक्स विभागात २५ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणी त्यांना पोस्ट केले जाऊ शकते.
या भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (















Discussion about this post