सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी असून ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
सिव्हिल इंजिनियर, कन्सलटंट या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी सहा ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे
पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने B.Tech/BE/ सिव्हिल इंजिनियर ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ६५ पेक्षा जास्त नसावे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला २५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
अर्जदाराला डिझाइन,व्हिझ्युलायझेशन, एम एस ऑफिसचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यांना प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्लानिंग ते डिझाइनपर्यंत सर्व गोष्टींचे निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी.
सिव्हिल इंजिनियर पदासाठी उमेदवाराला आसाम, दुलजैन या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे. तसेच या उमेदवाराला कामानुसार आसाम, मिझोराम, नागालँड अशा ठिकाणीदेखील जावे लागेल.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखत आणि Group Discussion द्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला मासिक वेतन १,६०,००० रुपये मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला तुमचा अर्ज, रिझ्युम con_app@oilindia.in या मेल आयडीवर पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे.















Discussion about this post