भुसावळ । प्लॉट खरेदी विक्रीच्या कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना वरणगाव फॅक्टरी परिसरात घडली असून घटनेने खळबळ उडाली आहे.
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायझर प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर होते. दरम्यान ११ सप्टेंबरला ते दुपारी जेवणासाठी घरी आले होते. याच वेळी त्यांचा मोठा भाऊ सतीश इंगळे हा त्यांच्या घरी आला होता. (Crime News) दरम्यान प्लॉट विक्रीवरून दोघांमध्ये काल देखील वाद झाला. यात सतीशने प्रदीप यास मारहाण करण्यास सुरवात केली. यातच सतीशने प्रदीपच्या डोक्यात बॅटने वार केला. यामध्ये प्रदीपचं मृत्यू झाला.
दरम्यान घटना घडल्यानंतर सतीश हा प्रदीपच्या मृतदेहाजवळ बसून होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर भुसावळचे (Police) पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सतीशला ताब्यात घेतले.















Discussion about this post